मेळघाटात हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी जीवघेणी पायपीट

 मेळघाटात हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी जीवघेणी पायपीट

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :हिरव्यागार निसर्गाचा व मनाला भुरळ घालणारा अद्भूत नजरा म्हणजे मेळघाट. निसर्गाच्या सानिध्यात दडलेल्या या मेळघाटाची ओळख त्याच्या सौंदर्याने देशभरात आहे. परंतु या मेळघाटाच्या नशिबी आलेले बालमृत्यू, माता मृत्यू, कुपोषण, बेरोजगारी असे अनेक भोग मात्र स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर सुटले नाही. अनेक सरकारे बदलली, पण मेळघाटाच्या कवेला घट्ट पकडून असलेला पाणी टंचाईचा भोग मात्र आजही कायम आहे. हंडाभर पाण्यासाठी डोंगर दऱ्यातून एक किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या या महिलांची व्यथा जाणून घेऊया. 

दुपारचे दोन वाजलेत, वरुन सूर्य जणू आग ओकतोय, अशा परिस्थितीत डोंगर दऱ्यातून वाट काढत पाण्यासाठी दगड गोट्यांना तुडवत दीड किलोमीटर चालत येणाऱ्या या महिला आहेत. मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील खडीमल गावात दरवर्षी मार्च महिला लागला की या महिलांचा असाच जीवघेणा प्रवास सुरु होतो. गावाबाहेरील विहिरीत टँकरने पाणी आणून खाली केले तर या विहिरीतून पाणी भरायला मिळले. मात्र या विहिरीत टँकरने पाणी टाकले नाही तर हंडाभर पाण्यासाठी 3 ते 4 किलोमीटरचा प्रवास आदिवासी महिलांना करावा लागतो.

Life-threatening pipeline for drinking water in Melghat

ML/ML/PGB
22 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *