मँग्रोव्ह झाडावर विषबाधा करून बेसुमार कत्तल

 मँग्रोव्ह झाडावर विषबाधा करून बेसुमार कत्तल

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाईंदर पूर्वेला नवघर पोलीस ठाणे हद्दीत इंद्रलोक पोलीस चौकीला अगदी चिटकून असलेल्या मौजे. नवघर सर्व्हे क्रं. नवीन 20 (जुना 212) या जागेत साधारणपणे 30 गुंठे जागेवर असलेल्या जुन्या 25 ते 30 वर्ष अवेसीनिया मरीना प्रजातीच्या (मँग्रोव्ह ) जुन्या झाडांवर विषप्रयोग करून बेसुमारपणे कत्तल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यात महसूल, पोलीस आणि वन विभागा सह पालिकेचीही बघ्याची भूमिका असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच आजूबाजूच्या परिसरात दिलेल्या बांधकाम परवानग्या आणि नवीन मंजुरीसाठी टाकलेल्या जागांना 50 मिटरचा बफर झोन न-लागण्यासाठी अनेक विकासकांचा हा कारनामा असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याची गुन्हे शाखेकडून तपासणीची मागणी पर्यावरण प्रेमींकडून करण्यात येत आहे. तर या कांदळवनातील मँग्रोव्ह तोड व विषप्रयोगाबाबत प्रशासनाच्या विरोधात न्यायालयाच्या आदेशाच्या अवमान प्रकरणी उच्च न्यायालयातही दाद मागणार असल्याचे पर्यावरण प्रेमींनी सांगितले आहे.

एकीकडे लोकसभा निवडणूकिच्या रणधुमाळीत प्रशासन व्यस्त असताना त्याच प्रशासनाला काही विकासकांनी हाताशी धरून कांदळवन कत्तल व विषप्रयोग करून मँग्रोव्ह संपविण्याचा डाव रचला आहे. त्यात विकासकांनी सदरचे कांदळवन नष्ट करण्यासाठी कांदळवन कत्तल करून नष्ट करून देणार्‍या नेत्याला कोट्यवधी रुपये दिल्याचे बोलले जात आहे. यामुळे सदर कांदळवन व त्यापासून 50 मिटर अंतर बफर झोन लागत असल्याने सदरचा कारनामा केला गेला आहे, असा संशय आहे. तसेच हजारो लोक राहत असलेल्या नागरी वस्तीत व पोलीस चौकीच्या शेजारी बिनधास्तपणे खुलेआम कत्तल केली जाते, याबाबत कोणीच काही बोलायला तयार होत नाही. यामुळे संशयाची पाल अधिक चुकचुकत आहे.तर महत्त्वाचे म्हणजे याच कांदळवन परिसरात भरणी करून डेब्रिज व कचरा टाकला जातो. तसेच पाणी नैसर्गिक उघाडीचे पाणी अडवून पर्यावरणाचा ह्रास केल्याच्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या आदेशानेच गेल्या महिन्यात 19 व 23 एप्रिल रोजी सदर कांदळवनापासून 50 मीटर परिसरात बांधकाम परवानगी दिल्या प्रकरणी महसूलचे मंडळ अधिकारी दिपक अहिरे, तलाठी नितीन पिंगळे, वनपाल भगवान मोडवे, वनरक्षक ज्ञानेश्वर म्हस्के, पालिका प्रभाग अधिकारी, उपायुक्त पर्यावरण विभाग, नगररचना विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ठाणे, मँग्रोव्ह सेलचे वनपरिक्षेत्र अधिकारी, भूमी अभिलेख सह स्थानिक नवघर पोलीस ठाण्याचे अधिकारी यांच्यासह 12 जणांच्या कमिटीने स्थळपाहणी करत पर्यावरणाचा ह्रास व 50 मीटर बफर झोनने बांधकाम बाधित होत असल्याचा अहवाल देऊन पर्यावरण विभागाची परवानगी न-घेता बांधकाम करत असल्याचा अहवाल दिला आणि त्यावर पर्यावरण संरक्षण कायदा 1986 व सीआरझेड कायदा 1991 व सीआरझेड अधिसूचना 2011 नुसार कारवाई करण्याचा अहवालही दिला आहे.

Mass slaughter by poisoning mangrove trees

ML/ML/PGB
22 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *