सिंदखेडराजामध्ये सापडले १३ व्या शतकातील शिवमंदिर

 सिंदखेडराजामध्ये सापडले १३ व्या शतकातील शिवमंदिर

बुलडाणा, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथील सिंदखेडराजा या शहराला मोठे ऐतिहासिक संचित लाभले आहे. सिंदखेडराजा हे राजमाता जिजाऊंचे माहेर. हा परिसर मराठ्या्च्या इतिहातील अनेक घटनांचा साक्षी झाला आहे. येथील ऐतिहासिक अशा राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीचे जीर्णोद्धाराचे काम सुरू असून त्यासाठी इथे उत्खनन केले जात आहे.हे उत्खनन करताना तेराव्या शतकातील यादवकालीनपूर्व शिवमंदिर या समाधीसमोर आढळले. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्याने याची नुकतीच पाहणी केली.

जिजाऊंचे पिताश्री सोळाव्या शतकातील राजे लखोजीराव जाधव यांच्यासह तीन मुले तसेच नातु यांच्या समाधीचे जतन व संवर्धनाचे कामे करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व विभाग उत्खनन करत आहे. याठिकाणी उत्खनन करताना त्यांना हे यादवकालीन शिवमंदिर आढळले. या मंदिरामध्ये महादेवाची मोठी पिंड असून हे मंदिर दगडी बांधकाम आहे.

समाधी चौथर्‍यापासून ५ फुट खोल व समाधी मंदिरापासून साधारण २० फुट अंतरावर ही शिवपिंड आहे.या मंदिराखाली दगडी फरशीसुद्धा टाकलेली आहे. याठिकाणी आणखी उत्खनन केले जाणार असून ते पूर्ण झाल्यानंतरच या मंदिराची आणखी रहस्य समोर येऊ शकतील,असे भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

SL/ML/SL

21 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *