पुण्यात दिवसाढवळ्या ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा

 पुण्यात दिवसाढवळ्या ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा

पुणे, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे शहरातील गुन्हेगारी कारवायांनी सध्या कहर केला आहे. आज भरदिवसा वानवडी हद्दीतील वाडकर मळा शेजारी असलेल्या बीजेएफ ज्वेलर्सच्या दुकानात सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. ही घटना दुपारी १२ च्या सुमारास घडली. दरोडेखोर हे चेहेऱ्यावर मास्क लावून आले होते. त्यांनी शस्त्राचा धाक दाखवत दुकानातील तब्बल ३०० ते ३५० ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले. त्यानंतर आरोपी दुचाकीवरून फरार झाले आहेत. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. सीसीटीव्हीत आरोपी दिसत आहेत.

वानवडी हद्दीतील मोहम्मद वाडी रोड वारकर मळा येथील बीजेएफ ज्वेलर्स या दुकानात आज १२ च्या सुमारास दरोडेखोर मास्क घालून दुकानात शिरले. त्यांनी काही शस्त्राच्या जोरावर दुकानातील कर्मचाऱ्यांना धाक दाखवून दुकानातील सोन्याचे आणि चांदीचे दागिने असे ३०० ते ३५० ग्रॅम वजनाचे दागिणे लंपास केले. आरोपी हे दुचाकीवरुन आले होते. त्यांनी एका काळ्या रंगाच्या बगेत सर्व दागिने भरून पोबारा केला. दुकानातून साधारण ७ अनोळखी इसमांनी मास्क लावून बीजेएफ ज्वेलर्समधून ३०० ते ४०० ग्रॅम सोन्या चांदीचे दागिने लुटले आहे.

भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. आता नागरिक दिवसा देखील सुरक्षित राहिले नाही असा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. वानवडी पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. घटनास्थळांचा पंचनामा त्यांनी केला आहे. दुकानातील सिसिटीव्ही देखील तपासण्यात येत आहे. सीसीटीव्हीत दोन दरोडे खोरांनी बंदुकीचा धाक दाखवून दुकान लुटले आहे. घटनास्थळी डीसीपी आर राजा, सपोआ इंगळे यांच्यासह स्थानिक पोलीस अधिकारीदेखील पोहोचले आहेत.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होणारे खून, लूटमार, कोयता गँगची दशहत यामुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यात आज दिवसाढवळ्या झालेल्या दरोड्याच्या प्रकाराने पुण्याच्या सुरक्षा व्यवस्थेसमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

SL/ML/SL

18 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *