दोडक्याची चटणी

 दोडक्याची चटणी

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ: 

२० मिनिटे

लागणारे जिन्नस: 

एक दोडका मध्यम आकाराचा, शक्यतो कोवळा बघून घ्या. एक मध्यम कांदा , एक टोमाटो, पाच सहा हिरव्या मिरच्या, एक मूठ शेंगदाणे, एक टे स्पून प्रत्येकी धणे जिरे, लिंबा एवढी चिंच, मीठ चवीनुसार, कढिपत्ता, एक चमचा प्रत्येकी उडिद डाळ, हरबरा डाळ, व फोडणीचे साहित्य,
कोथिंबीर १०० ग्राम फ्रेश चिरून घेउन. लाल मिरच्या तीन चार फोडणी साठी. सहा सात लसुण पाकळ्या सोलून.

क्रमवार पाककृती: 

सर्व प्रथम दोडक्याच्या शिरा काढून मध्यम आकाराचे तुक डे करुन घ्या. कांदा व टोमाटो पण चिरून घ्या. बाजूला ठेवा.
तव्यावर एक चमचा तेल घालुन त्यात धणे जिरे चांगले परतुन घ्या. छान वास येइपरेन्त. मग त्यात मूठ भर शेंगदाणे घाला व परता, आणि आता तुम्हाला चटणी जितकी तिखट हवी तितक्या हिरव्या मिरच्या घालून परतून घ्या. हे सर्व गार करुन मिक्सर मधून काढून घ्या. बाजूस ठेवा.

आता त्याच तव्यात एक चमचा तेल घालून दो डके, कांदा, टोमाटो , कोथिंबीर परतून घ्या. व झाकण ठेवा, पाच सात मिनिटानी त्यात चिंच घालून परत झाकण ठेवा, मिश्रण कोरडे वाटल्यास दोन चमचे पाणी घाला. वाफेवर सर्व भाज्या शिजून येतात तो परेन्त वाट बघा. चवी पुरते मीठ घाला.

हे पण गार होउद्या, मग मिक्सर मधून काढा, पहिले वाटप व हे एकत्र चांगले मिसळून एकजीव करुन घ्या.

आता फायनल फोडणी: तेलात मोहरी , जिरे, उडीद डाळ चणा डा ळ, लाल मिरच्या सुक्या तीन चार, कढिपत्ता हिंग घालून फोडणी चरचरीत बनवा व गॅस बंद करुन दोडक्याचे वा टपाचे मिश्रण त्यात घालून मिसळून घ्या. बीर काया पचडी तयार आहे. बीरकाया म्हण जे तेलुगुत दोडका.

आंध्रा पद्धती नुसार गरम गरम पहिल्या वाफेच्या सोना मसुरी तांदळाच्या भाता बरोबर ; एका भागात कंदी पोडी व वरून तूप त्यानंतर बीरकाया पचडी बरोबर खा. अजून थोडा भात घेउन मस्त टोमॅटो/ पेपर रसम , अप्पलम कव डी दही ह्या बरोबर भाताला ही पच डी लावुन खा. स्वर्गच तो ताटात. मग पडी टाका.

साखर घालायची नाही. आंबट तिखटच चव हवी.

Dodka chutney

ML/ML/PGB
16 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *