१९ मे ला अंदमानात दाखल होणार मान्सून
पुणे, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या देशभरात विविध ठिकाणी जोरदार हजेरी लावणारा पूर्व मोसमी पाऊस आता लवकरच दीर्घकालिन वास्तव्यासाठी येणार आहे. दरवर्षी साधारण मे अखेरीस अंदमानात दाखल होणारा मान्सून यावर्षी एक आठवडा आधीच दाखल होणार आहे. मोसमी पावसाबाबत IMD ने ही महत्त्वाची माहिती दिली आहे. मोसमी पाऊस यंदा वेळेआधीच म्हणजे १९ मे रोजी अंदमान-निकोबारमध्ये दाखल होणार आहे.
दरवर्षी हा पाऊस २५ मे नंतर ला अंदमान-निकोबार बेटांवर दाखल होतो. याचा अर्थ यंदा तो एक आठवडा आधीच भारतीय भूमीवर पोहोचणार आहे. मोसमी पाऊस साधारणपणे १ जूनला केरळमध्ये पोहोचतो आणि नंतर देशभरात त्याची वाटचाल होते. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी वारे शनिवारी १९ मे रोजी देशाच्या महासागरीय क्षेत्रात म्हणजे बंगालच्या उपसागरातील आग्नेय भागात, दक्षिण अंदमान आणि निकोबार बेटावर धडक देण्याचा अंदाज आहे.
अलर्ट जारी करताना, हवामान खात्याने असेही म्हटले आहे की, यावर्षी देशातील 20 हून अधिक राज्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. दक्षिण कर्नाटकात चक्रीवादळ निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील ५ दिवस मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हवामान खराब राहील. येथे ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो.
SL/ML/SL
14 May 2024