घाटकोपर होर्डिंग् दुर्घटना प्रकरणात होर्डिंग कंपनी आणि रेल्वे वर गुन्हा दाखल

मुंबई दि.13(एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईत आज अचानक आलेल्या जोरदार वादळी वारे आणि तुफानी पावसामुळे घाटकोपर भागात रेल्वेच्या हद्दीत लावलेले एक अनधिकृत होर्डींग कोसळून झालेल्या भीषण अपघातात त्याखाली ऐशी वाहने आणि त्यातील सुमारे दीडशे व्यक्ती अडकल्या आहेत, याप्रकरणी संबधित होर्डींग कंपनी आणि रेल्वे वर मुंबई महापालिकेने गुन्हा दाखल केला आहे.
घाटकोपर पूर्व येथील पंतनगरमध्ये हायवेवर पोलीस ग्राऊंड पेट्रोल पंप आहे. मुंबईत अचानक पाऊस व वादळ सुटल्याने सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास या पेट्रोल पंपावर 120 फूट × 120 फुटांचे भलेमोठे होल्डिंग कोसळले. या घटनेत तब्बल 35 जण जखमी झाले आहेत. या होर्डिंगखाली 100 हून अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींना राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. एनडीआरएफ ची टीम घटनास्थळी दाखल झाली असून तातडीने बचाव कार्य सुरु आहे.
घाटकोपरमध्ये कोसळलेले हे होल्डिंग इगो मिडिया कंपनीने उभारले होते.हे होल्डिंग अनधिकृत असल्याचा आरोप होत असताना, पालिकेने संबंधित होर्डिंग उभारणीवर आक्षेप घेतला होता. पालिका केवळ 40 फूट × 40 फूट होर्डिंग उभारणीला परवानगी देते. परंतु कोसळलेले होर्डिंग 120 फूट × 120 फुटांचे होते. रेल्वेच्या जागेवर हे होर्डिंग होते. रेल्वे पोलिसांनी यासाठी परवानगी दिल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित जागेवर असलेल्या झाडांवर विषप्रयोग केल्याप्रकरणीही जाहीरात कंपनीवर पालिकेने गुन्हा दाखल केला आहे.
आतापर्यंत सात ते आठ जणांना होर्डिंग खालून बाहेर काढण्यात आलं आहे. जवळपास ८० गाड्या होर्डिंगखाली दबल्या गेल्या आहेत. यावरुन होर्डिंगच्या आकाराचा अंदाज आपल्याला बांधता येईल. बचावकार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. पेट्रोल पंपाच्या ऑफिसमध्ये देखील काही माणसं होती. होर्डिंग लोखंडी असल्याने बचावकार्याला वेळ लागण्याची शक्यता आहे.
SW/ML/SL
13 May 2024