एप्रिलमध्ये विक्रमी GST संकलन

 एप्रिलमध्ये विक्रमी GST संकलन

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सरकारने एप्रिल 2024 मध्ये वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST मधून विक्रमी 2.10 लाख कोटी रुपये गोळा केले आहेत. आतापर्यंत कोणत्याही महिन्यात जमा झालेला हा सर्वाधिक जीएसटी आहे. यापूर्वीचे सर्वोच्च संकलन 1.87 लाख कोटी रुपये होते, जे एप्रिल 2023 मध्ये झाले होते. एकूण GST संकलन वार्षिक आधारावर 12.4% वाढले आहे. तर गेल्या महिन्यात म्हणजेच मार्च 2024 मध्ये जीएसटी संकलन 1.78 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच महिन्या-दर-महिन्यानुसार संकलनात 18% वाढ झाली आहे. सरकारने 18 हजार कोटी रुपयांचा परतावा जारी केला.

वित्त मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, एप्रिलसाठी ₹2,10,267 कोटींच्या GST संकलनापैकी CGST 43,846 कोटी रुपये आणि SGST 53,538 कोटी रुपये होता. IGST 99,623 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर गोळा केलेल्या 37,826 कोटी रुपयांसह) आणि उपकर 13,260 कोटी रुपये होता. उपकरामध्ये वस्तूंच्या आयातीतून मिळालेल्या 1008 कोटी रुपयांचा समावेश आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी आकडा त्यांच्या एक्स खात्यावर पोस्ट करून आनंद व्यक्त केला आहे. अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एका महिन्यात प्रथमच जीएसटी महसूल दोन लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला असून यापूर्वी मार्च महिन्यातही मोठ्या प्रमाणात जीएसटी वसुली झाली होती ज्यात वार्षिक आधारावर ११.५% वाढ झाली.
मार्चमध्ये जीएसटी संकलन १.७८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले होते. म्हणजेच महिना आधारावर संकलनात १८% वाढ झाली असून सरकारने १८,००० कोटी रुपयांचा परतावा जारी केला. परताव्यानंतर एप्रिल २०२४ साठी निव्वळ जीएसटी महसूल १.९२ लाख कोटी रुपये होता. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या म्हणजेच एप्रिल २०२३ पेक्षा हे प्रमाण १७.१% जास्त आहे.

जीएसटी हा अप्रत्यक्ष कर आहे. 2017 मध्ये पूर्वीचे विविध अप्रत्यक्ष कर (VAT), सेवा कर, खरेदी कर, उत्पादन शुल्क आणि इतर अनेक अप्रत्यक्ष कर बदलण्यासाठी त्याची अंमलबजावणी करण्यात आली. जीएसटीचे 5, 12, 18 आणि 28% असे चार स्लॅब आहेत.

SL/ML/SL

1 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *