रंगभूमीवरील पार्श्वसंगीतकार दादा परसनाईक कालवश

 रंगभूमीवरील पार्श्वसंगीतकार दादा परसनाईक कालवश

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी रंगभूमीवरील प्रख्यात पार्श्वसंगीतकार दादा परसनाईक यांचे आज सकाळी मुंबईत राहत्या घरी झोपेतच हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.. ते ऐंशी वर्षाचे होते.

३०० हून अधिक दूरचित्रवाणी मालिका तसेच १५०० हून अधिक व्यावसायिक नाटकांना त्यांनी पार्श्वसंगीत दिले आहे.
गेली ४५ वर्ष रंगभूमीवर पार्श्वसंगीतकार म्हणून ते अविरत कार्यरत होते.मुंबई दूरदर्शन च्या स्थापनेपासून ते आजतागायत अनेक मालिका,नाटकं आणि कार्यक्रमांना त्यांनी संगीत दिले होते..

आज संध्याकाळी पाच वाजता त्यांच्या पार्थिव देहावर दादर शिवाजी पार्क इथल्या स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या आधी शिवाजी मंदिर नाट्यगृहात त्यांचे पार्थिव शरीर अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. नाट्य चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरानी त्यांच्या जाण्याने एक सच्चा नाट्यकर्मी गमावल्याची भावना व्यक्त केली आहे. Dada Parasnaik Kalavash,

ML/ML/PGB
27 Apr 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *