तब्बल १२ वर्षांनी गुरूचा वृषभ राशीतील प्रवेशाचा राशींवरील परिणाम , गुरुचे वृषभ राशीत आगमन(Guru / Jupiter transit in Taurus)

 तब्बल १२ वर्षांनी गुरूचा वृषभ राशीतील प्रवेशाचा राशींवरील परिणाम , गुरुचे वृषभ राशीत आगमन(Guru / Jupiter transit in Taurus)

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

दिनांक 1 मे 2024 रोजी गुरू /बृहस्पतिचा 12 वर्षांनी वृषभ राशीत म्हणजेच दैत्य गुरु शुक्रांच्या राशीत प्रवेश होणार आहे.एक वर्षानंतर 14 मे ,2025 र्रोजी गुरु मिथुन राशीत प्रवेश करेल.

गुरु हा ग्रह ज्योतिष शास्त्रामध्ये अतिशय शुभ मानला जातो. (The planet Jupiter is one the most auspicious planets in the zodiac sign ) .हा ग्रह आकाराने मोठा आहे.( Jupiter is the largest planet in our Solar System ) गुरु म्हणजे मांगल्य. कुंडलीत जर गुरुचे बळ असेल तर माणसाची भोतिक प्रगती होते.हा ग्रह प्रसरणशील(Expanding )असल्याने माणसाची भरभराट होते .

गुरु हा भाग्याचाही कारक असल्याने अनेक गोष्टी माणसाला प्रयत्नावाचून मिळतात.(Jupiter The Planet Of Luck And Good Fortune )गुरु हा शिकवून शहाणे करून ,
सुसंस्कृत करून समाधानी करतॊ तसेच माणसाला हळू हळू परिपक्व (Mature) करतो.

गुरु या ग्रहाचा प्रभाव प्रामुख्याने धार्मिक क्षेत्रे
(Holyplace),ज्ञानदेणारीक्षेत्रेम्हणजेचशाळाकॉलेज(schoolcollege),बँकिंग सेक्टर
(Banking Sect),
वकील(lawyer),न्यायपालिका(Judiciary),विदेशमंत्रालय
(The Ministry of External Affairs) तसेच कपडयाचे व्यापारी (cloth merchant) व भांड्याचे व्यापारी (Vessel) ,सोने (Gold ) ,दागिने (Ornament ),धर्मादाय संस्था(Charity Trust), कर्ज,लॉटरी, खाद्यपदार्थातील हळद(Turmeric) या वरती दिसतो.

गुरु हा ग्रह मकर राशीत नीचीचा आणि कर्क या राशीत उच्चीचा असतो. विशोत्तरी महादशेमध्ये गुरूला १६ वर्षे देण्यात आली आहेत.धनु तथा मीन ह्या गुरूच्या राशी असून पुनर्वसु ,विशाखा आणि पूर्व भाद्रपदा ह्या नक्षत्रांचा स्वामी गुरु आहे. गुरु राशी बदल हा थोडा सुखकारक असेल. भारताच्या पंचम स्थानी गुरुचे आगमन होत आहे , त्यामुळे देशाच्या खेळाडूंकरिता तसेच कलाकार,लहान मुले शिक्षणसंस्था याकरिता उत्तम कालावधी या काळात जननसंख्येत वाढ.

महाराष्ट्र राज्याच्या कुंडलीचा जर आपण विचार केला तर होणारा गुरु बदल हा महाराष्ट्र राज्याकरिता ठीकठाक आहे. राज्यातील मंत्री,धार्मिक व्यक्ती,डॉक्टर्स,मोठ्या व्यक्ती तसेच त्यांचे सल्लगार आजारी पडतील तसेच काहींवर आरोप होंतील.संसर्गजन्य रोगांची वाढ होईल ,पोटाचे विकार वाढतील.

राशीफळ

(हे वर्णन ढोबळमानाने मांडले असून,व्यक्तीचे भविष्य त्याच्या मूळ कुंडली वरूनच अचूक वर्तवता येते)

“देवानां च ऋषीनां च गुरुं कांचन सन्निभम्
बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम्”
हा जप रोज १२ वेळा म्हणावा

मेष – धन लाभ तसेच प्रगतीचे योग

वृषभ -भाग्यात वाढ होईल तसेच धार्मिक तसेच आध्यात्मिक प्रगती

मिथुन -वास्तू तथा धन प्राप्तीचे योग् ,घरापासून लांब प्रगती ,यश

कर्क -इच्छापूर्ती तसेच लाभाचे योग

सिंह -आपल्या कर्माने लाभ आणि सुख समृद्धीचे योग

कन्या -परिश्रमातून मोठे यश ,भाग्याचीही मिळेल साथ.

तुला -चांगली कामे / कर्म करा तर लाभ अन्यथा वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल

वृश्चिक – उन्नतीचे/ प्रगतीचे योग पण मित्रांपासून सावध राहा
धनु -लाभाचा काळ परंतु प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक

मकर -कार्यात सफल होणार आणि लाभ मिळणार

कुंभ – संघर्ष केल्यास हमखास यश

मीन – यशाचे /प्रगतीचे प्रबळ योग

जितेश सावंत

के. पी. विशारद , नक्षत्र सम्राट, वास्तू तज्ञ (Astro Vastu Consultant),शेअर बाजार (Stock Market) / सायबर कायदा(cyber law) तज्ञ

jiteshsawant33@gmail.com

JS/ ML/ SL

26 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *