लैंगिक छळ विरोधी माहिती पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई दि.25(एम एमसी न्यूज नेटवर्क) : महिला कर्मचाऱ्यांचे कार्यालयीन ठिकाणी होणारे लैंगिक छळाविरोधी जनजागृती विषयी सावित्रिबाई फुले स्त्री संसाधन केंद्र मुख्य तक्रार समितीकडून तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या हस्ते बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज (२५ एप्रिल ) करण्यात आले.
सह आयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत, उप आयुक्त (शिक्षण) तथा महिला कर्मचाऱ्यांचा कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ विरोधी समितीच्या अध्यक्षा श्रीमती चंदा जाधव, समितीच्या सचिव श्रीमती अपूर्वा प्रभू, प्रमुख अधिकारी (आपत्कालीन व्यवस्थापन) श्रीमती रश्मी लोखंडे उपस्थित होते.
कार्यालयीन काम करत असताना महिलांचा लैंगिक छळ होत असल्यास त्यांनी कोणाकडे तक्रार करावी, कायद्याने त्यांना मिळणारे संरक्षण आदी महत्त्वाच्या बाबींची माहिती या पुस्तिकेत आहे.
SW/ML/SL
25 April 2024