अंध मतदारांसाठी ब्रेल लिपीचे प्रशिक्षण

अकोला, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिव्यांग विशेषत: अंध मतदारांना मतदान प्रक्रिया पूर्णपणे पार पाडता यावी या उद्देशाने दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या वतीने अंध मतदारांसाठी ब्रेल लिपीचे प्रशिक्षण अकोल्यात देण्यात आले. ब्रेल लिपी प्रशिक्षणामुळे अंध मतदारांसाठी मतदान केंद्रावर असलेल्या डमी बॅलेट पेपरवर उमेदवारांची नावे, त्यांचे चिन्ह ब्रेल लिपी मध्ये अनुभवण्याची सुविधा उपलब्ध असून अंध मतदारांना ब्रेल लिपीचे प्रशिक्षण दिल्यामुळे त्यांना मतदान करणे सहज आणि सोपे होणार आहे.
त्यामुळे अकोल्यात अंध मतदारांसाठी ब्रेल लिपीचे देण्यात आलेले प्रशिक्षण अंध मतदारांच्या मतदान टक्केवारीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार ब्रेल लिपीचे देण्यात आलेले प्रशिक्षण अंध मतदारांच्या मतदान टक्केवारीसाठी महत्त्वपुर्ण ठरणार आहे. असा विश्वास अंध मतदारांनी व्यक्त केला आहे.. ब्रेल लिपी प्रशिक्षणाच्या माध्यमातून अंध मतदारांनी मतदान कसे करायचे याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
ML/ML/SL
25 April 2024