केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ

नवी दिल्ली, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्ली सरकारच्या मद्यविक्रीसंबंधातील अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्ली न्यायालयाने आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत ७ मे पर्यंत वाढ केली.राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी हा आदेश दिला आहे.
न्यायाधीश बावेजा यांनी केजरीवाल यांना ७ मे रोजी दुपारी २ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले.ईडीने केजरीवाल यांना २१ मार्च रोजी या प्रकरणात नोंदवलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात मुख्य कटकारस्थान रचल्याच्या आरोपावरून अटक केली होती.२२ मार्च रोजी केजरीवाल यांना ईडीने न्यायाधीश बावेजा यांच्यासमोर हजर केले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना २८ मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवले.त्यानंतर पुढील १ एप्रिलच्या केजरीवाल यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर ती आजपर्यंत वाढवण्यात आली होती. आज पुन्हा न्यायालयीन कोठडी ७ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
ऐन निवडणूकांच्या रणधुमाळीत केजरीवालाच्या कोठडी कालावधीत वाढ होत असल्याने आता आप पक्षाचे राजकीय भविष्य पणाला लागले आहे. दिल्लीतील निवडणूकांपूर्वी केजरीवालांची सुटका होणे आता कठीण दिसत आहे.
SL/ML/SL
23 April 2024