अकोल्यात जोरदार पाऊस आणि गारपीट

अकोला, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातल्या वाडेगाव आणि हिंगणा गावाला अवकाळी पावसाने चांगलंच झोड़पलं. वाऱ्याच्या अवकाळी पावसासह गारपिट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे आधीच अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा एकदा आजच्या पावसाने हतबल झालाय. दरम्यान हवामान विभागांने अकोल्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा अंदाज दिला होता, त्यानूसार आज अकोला जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. वाढत्या उन्हाच्या तापमानात आजचा पाऊस काहिसा अकोलेकरांना दिलासादायक ठरणार आहे.
ML/ML/SL
23 April 2024