‘मतदान जागृती घोषवाक्य’ व ‘मतदान जागृती गीतलेखन’ रिल्स स्पर्धा

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :रिल्स स्पर्धा- रिल्स स्पर्धा- रिल्स स्पर्धा
‘अखिल भारतीय साहित्य परिषद’ पुरस्कृत ‘साहित्य भारती कोकण प्रांत’ आयोजित ‘मतदान जागृती घोषवाक्य’ व ‘मतदान जागृती गीतलेखन’ रिल्स स्पर्धा
नागरिकांनो मोठ्या संख्येत सहभागी व्हा
नियमावली :
१) जास्तीत जास्त नागरिकांनी आपले मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावावे याकरिता जनजागृती निर्माण करण्याकरता या दोन्ही स्पर्धा घेण्यात येत असून कोणत्याही पक्षाचा, व्यक्तीचा, संस्थेचा प्रचार त्यात करू नये.
२) आपल्या रिल्समध्ये कोणत्याही जाती, धर्माच्या, समाजाच्या वा व्यक्तींच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी आपण घ्यावी. निवडणूक आयोगाच्या अचारसंहितेत राहून आपले घोषवाक्य अथवा गीत तयार करावे.
३) घोषवाक्याच्या रिल्स स्पर्धेकरता जास्तीत जास्त एक मिनिटांची मर्यादा असून त्यात सुरुवातीला ‘अखिल भारतीय साहित्य परिषद’ पुरस्कृत ‘साहित्य भारती कोकण प्रांत’ आयोजित ‘मतदान जागृती घोषवाक्य’ स्पर्धेत मी (आपले नाव नमूद करावे) सहभागी होत असून माझे घोषवाक्य पुढीलप्रमाणे…
४) गीत लेखनाच्या रिल्स स्पर्धेकरता जास्तीत जास्त तीन मिनिटांची मर्यादा असून त्यात सुरुवातीला ‘अखिल भारतीय साहित्य परिषद’ पुरस्कृत ‘साहित्य भारती कोकण प्रांत’ आयोजित ‘मतदान जागृती गीतलेखन’ स्पर्धेत मी (आपले नाव नमूद करावे) सहभागी होत असून आपले गीत सादर करावे. गीत सादरिकरणाकरता वाद्यवृंदाची आवश्यकता नाही. आपण एकट्याने ते सादर करू शकता.
५) स्पर्धेत सहभागी होण्याकरता सोबत दिलेल्या गुगल फॉर्ममध्ये आपली माहिती नमूद करणे आवश्यक असून आपला विडिओ 9967764468 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावा. तसेच आपल्या समाजमाध्यमावरही (फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर) तो वायरल करावा व त्याची लिंकही पाठवावी.
६) दोन्ही स्पर्धेकरता विडिओ पाठवण्याची तारीख १० मे २०२४ असून त्यानंतर आलेले विडिओ स्पर्धेत सहभागी करून घेता येणार नाहीत.
७) स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात येणार असून अनुक्रमे सन्मानपत्र व रोख रक्कम ₹३०००, ₹२०००, ₹१००० देऊन स्वतंत्र कार्यक्रमात गौरविण्यात येईल.
८) आपण आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्यास ‘अखिल भारतीय साहित्य परिषद’ त्यास जबाबदार राहणार नसून स्पर्धेत बदल करण्याचे सर्व अधिकार परिषदेस असतील.
९) स्पर्धा सर्व वयोगटासाठी खुली असून सहभागाकरता कोणतेही शुल्क नाही. अधिक माहितीकरता संपर्क : प्रवीण देशमुख – 7506740652
गुगल फॉर्म लिंक:
https://forms.gle/q3M8yMy4B1RiGCBa9
ML/ML/PGB 22 APR 2024