वंदे भारत प्रमाणेच बुलेट ट्रेनही असणारी स्वदेशी

 वंदे भारत प्रमाणेच बुलेट ट्रेनही असणारी स्वदेशी

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात वंदे भारत एक्स्प्रेस लोकप्रिय झाली आहे. सेमी हायस्पीड असलेली ही रेल्वे सुरु करण्याची मागणी अनेक ठिकाणावरुन होत आहे. यामुळे महाराष्ट्रात आठ मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहे. वंदे भारत एक्स्प्रेसनंतर आता देशाला बुलेट ट्रेनचे वेध लागले आहे. रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी देशात २०२६ मध्ये बुलेट ट्रेन सुरु होणार असल्याचे म्हटले होते. या बुलेट ट्रेनसंदर्भात आता महत्वाचे अपडेट आले आहे. ही बुलेट ट्रेन वंदे भारतप्रमाणे स्वदेशी असणार आहे. देशात स्वदेशी वंदे भारत ट्रेनच्या निर्मितीचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे बुलेट ट्रेनच्या स्वदेशी उत्पादन होणार आहे.

इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, वंदे भारत ट्रेनच्या पद्धतीने बुलेट ट्रेन भारतात तयार होणार आहे. चेन्नई येथील भारतीय रेल्वेच्या इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) येथे ‘मेड इन इंडिया बुलेट ट्रेन’चे डिझाइन तयार केले जात आहेत. जागतिक पातळीवर चर्चेत असलेली फ्रॉन्सची TGV आणि जपानीची शिंकानसेन सारखी हाय-स्पीड ट्रेन ताशी 250 किमीपेक्षा जास्त वेगाने धावतात. परंतु भारतातील या ट्रेनचा वेग ताशी 250 किलोमीटर किंवा त्याहूनही जास्त असणार आहे.भारतात तयार होणारी शिंकानसेन E5 साखळीतील ही बुलेट ट्रेन ताशी 320 किमी प्रति वेगाने धावणार आहे.

अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेनसाठी भारताने जपानचे तंत्रज्ञान वापरले जात आहे. या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीने (JICA) ₹40,000 कोटी कर्ज दिले आहे. या योजनेचा एकूण खर्च ₹1.08 लाख कोटी आहे. अहमदाबाद ते मुंबई दरम्यान सुरु असणाऱ्या बुलेट ट्रेन प्रोजेक्टचे काम नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) करत आहे. या प्रकल्पाचे 300 किमीचे पीयर वर्क पूर्ण झाल्याची माहिती कंपनीकडून नुकतीच देण्यात आली. हा संपूर्ण मार्ग 508 किमी आहे.

SL/ML/SL

21 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *