तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक उमेदवारी 317 अर्ज वैध

 तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक उमेदवारी 317 अर्ज वैध

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील लोकसभा निवडणूक 2024 च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे 2024 रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील 11 मतदारसंघात 361 उमेदवारांचे 522 अर्ज दाखल झाले होते. अर्जांची छाननी केल्यानंतर एकूण 317 उमेदवारांचे अर्ज वैध असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर रायगड लोकसभा मतदार संघात 21, बारामती-46, उस्मानाबाद-35, लातूर-31, सोलापूर-32, माढा-38, सांगली-25, सातारा-21, रत्नागिरी-सिंधुदुर्ग-9, कोल्हापूर-27 आणि हातकणंगले मतदारसंघात-32 असे एकूण 317 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

ML/ML/SL

21 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *