नागालँडमधील ६ जिल्ह्यांमध्ये शून्य मतदान

कोहिमा, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांसाठी काल सुमारे ६०% मतदान पार पडले. नागालँड राज्यामध्येही काल मतदान झाले. मात्र पूर्व नागालँड भागातील जवळपास ४ लाख मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला नाही.ईशान्येकडील नागालँड मधील नागालँड पिपल्स ऑर्गनायझेशनने गेल्या सात दिवसांपासून पुकारलेल्या बंदमुळे पूर्व नागालँडमधील सहा जिल्ह्यांमध्ये शून्य मतदान झाले. मतदानाच्या आधीच ईस्टर्न नागालँड पीपल्स ऑर्गनायझेशनने मतदानावर बहिष्काराचा इशारा दिला होता. यानंतर आता नागालँड राज्य निवडणूक आयोगाने या संघटनेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मात्र, यावर संघटनेने उत्तर देत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा हा निर्णय प्रत्येकाचा वैयक्तिक असल्याचे म्हटले आहे.
सकाळी नेहमीप्रमाणे सात वाजता मतदानाला सुरुवात झाली मात्र संध्याकाळ पर्यंत या मतदान केंद्रांवर एकही मतदार आला नाही. मतदान कर्मचारी सर्व तयारीनिशी या बुथवर आले होते. मात्र मतदार फिरकले नाहीत. या काळात रस्त्यावरही वाहतूक दिसत नव्हती. या संदर्भात नागालँड पीपल्स ऑर्गनायझेशनवर कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आदिवासी संघटनेने वेगळ्या राज्याच्या मागणीसाठी हा संप पुकारला आहे. यावेळी २० आमदारांनीही मतदान केले नाही.
नागालँडमध्ये पूर्वेकडील मोन, तुएनसांग, लोंगलेंग, नोक्लाक, शामटोर आणि किफिरे हे सहा जिल्हे आहेत. आता नागालँडमध्ये सध्या भाजपा सत्तेत आहे. मात्र, या सहा जिल्ह्यांसाठी सरकारने दिलेले आश्वासने पाळले नाहीत, त्यामुळे मतदानावर बहिष्कार टाकला असल्याचे सांगितले जात आहे. नागालँडमधील ईस्टर्न नागालँड पीपल्स ऑर्गनायझेशनने या जिल्ह्यांसाठी स्वतंत्र प्रशासनाची मागणी केलेली आहे. पण हे आश्वासन पाळले जात नसल्यामुळे बहिष्काराचे आवाहन करण्यात आले.
दरम्यान, वेगळ्या नागालँड राज्याच्या मागणीबद्दल आपला काहीही आक्षेप नसून आपण त्याबाबतचा प्रस्ताव पाठवला आहे, असे नागालँडच्या मुख्यमंत्र्यांनी मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
SL/ML/SL
20 April 2024