या राज्यात Bird Flu मुळे ३५०० पक्ष्यांचा मृत्यू

 या राज्यात Bird Flu मुळे ३५०० पक्ष्यांचा मृत्यू

तिरुवनंतपुरम, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केरळमधील अलप्पुझा जिल्ह्यात दोन ठिकाणी जीवघेणा बर्ड फ्लू पसरल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. येथे एडठवा ग्रामपंचायतीच्या प्रभाग 1 आणि चेरुथना ग्रामपंचायतीच्या प्रभाग 3 मधील बदकांमध्ये या विषाणूची लागण आढळून आली आहे. 12 एप्रिलपासून एडठवा येथे 3 हजार पक्षी तर चेरुथना येथे 250 पक्षी मारले गेले आहेत. मृत पक्ष्यांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवले असता, त्यांच्यामध्ये एव्हियन इन्फ्लूएंझा (H5N1) म्हणजेच बर्ड फ्लूची पुष्टी झाली. आता येथे 21 हजार पक्षी मारले जाणार आहेत.

बर्ड फ्लूची पुष्टी झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली, ज्यामध्ये इन्फेक्टेड केंद्रापासून एक किलोमीटरच्या परिघात संक्रमित पक्षी मारून नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला. यासाठी जलद कृती दल तयार करण्यात येत आहे. त्यासोबतच प्राणी कल्याण विभागानेही तयारी सुरू केली आहे.हा आजार माणसात पसरण्याची शक्यता नसल्याने विनाकारण घाबरून जाण्याची गरज नाही, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

बर्ड फ्लू हा पक्षांमध्ये पसरणारा एक संसर्गजन्य रोग आहे. ज्याला बर्ड फ्लू वा एवियन एन्फ्लुयेन्झा (avian influenza) असंही म्हणतात. जो पक्षांच्या लाळेवाटे, विष्ठेवाटे किंवा त्यांच्या डोळ्यांवाटे इतर पक्ष्यांमध्ये पसरतो. पक्ष्यांनी पंख जरी झटकले, तरी हा विषाणू इतरत्र पसरु शकतो. ज्या पक्षांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते, ते पक्षी यामुळे दगावतात. पक्षांद्वारेच हा रोग माणसांपर्यंत पोहचतो. जे लोक पोल्ट्री व्यवसाय करतात, वा कोंबड्या वा इतर पक्षांची ज्यांचा जवळचा संबंध आहे, त्यांच्यामध्ये हा रोग पसरण्याची शक्यता जास्त असते.

SL/ML/SL

19 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *