नाचणीच्या इडल्या

 नाचणीच्या इडल्या

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाचणी (पीठ नाही, अख्खी नाचणी) – दोन वाट्या
उकडा तांदूळ – दोन वाट्या
उडीद डाळ – एक वाटी
मेथीचे दाणे- अर्धा चमचा
चवीनुसार मीठ.

डाळ, तांदूळ, नाचणी वेगवेगळ्या भांड्यात भिजवून ठेवायचे. त्यातल्याच एका भांड्यात मेथीचे दाणेही घालून ठेवायचे. मी पाच तास ठेवते. तुम्ही नेहमी जेवढा वेळ ठेवता तेवढा वेळ ठेवा. नंतर नेहमीप्रमाणे वाटून घ्यायचं. मी तांदूळ आणि नाचणी एकत्र वाटते. त्यामुळे नाचणी चांगली वाटली जाते.
सगळं वाटून झालं की नीट एकजीव करून, चवीनुसार मीठ घालून फुगण्यासाठी ठेवून द्यायचं. शक्यतो रात्री. म्हणजे सकाळपर्यंत पीठ छान फुगतं. नाचणीमुळे पीठ लवकर फुगतं असा माझा अनुभव आहे. शिवाय सध्या उन्हाळा आहे. त्यामुळे पुरेशा मोठ्या भांड्यात पीठ ठेवलेलं चांगलं.

तर, पीठ पुरेसं फुगलं की डावेने हलक्या हाताने ते हळूहळू ढवळायचं. आतली थोडी हवा बाहेर जाते, पण पीठ चांगलं एकजीव, सरसरीत होतं. वाफवल्यावर इडल्या व्यवस्थित फुगतात. इडलीपात्रात पुरेसं पाणी घेऊन ते गरम करत ठेवायचं. इडलीच्या साच्याला प्रत्येक खळग्यात पुसटसा तुपाचा हात लावून त्यात पीठ घालायचं. पाण्याला उकळी आली की स्टँड आत ठेवून झाकण लावून बारा-तेरा मिनिटं इडल्या वाफवायच्या. वाफेच्या वासावरून समजतं, इडल्या झाल्या की नाही ते. झाल्या की स्टँड बाहेर काढून, तिरका करून आत साठलेलं वाफेचं पाणी काढून टाकायचं. प्रत्येक ताटली वेगळी करायची. थोड्या गार झाल्यावर इडल्या काढून घ्यायच्या. चटणी किंवा सांबाराबरोबर खायच्या 

Ragini idlis

ML/ML/PGB
19 Apr 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *