मतदान केंद्रांवर संस्कृतीचे दर्शन

 मतदान केंद्रांवर संस्कृतीचे दर्शन

मतदान केंद्रांवर जंगल, पर्यावरण, आदिवासी संस्कृतीचे दर्शन……

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निवडणूक प्रक्रियेत सर्वच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा म्हणून अभिनव उपक्रम राबवले जातात. त्यातलाच एक भाग म्हणजे यावेळी लोकसभा निवडणुकीतील काही मतदान केंद्रांची रचना वेगवेगळ्या विषयांवर आधारित करण्यात आली आहे. यातील बहूतांश केंद्र ही जंगल आणि पर्यावरणाची निगडीत विषयांवर सजवण्यात आली आहेत.

मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा म्हणून सरकारकडून आवाहन केले जात आहे. मतदारांना मतदान केंद्राकडे आकर्षित करण्यासाठी यावर्षी नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील कट्टा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील मतदान केंद्राची संकल्पना बांबूवर आधारित आहे.

एवढेच नाही तर अनेक केंद्रांवर सेल्फी पॉईंट्स तयार करण्यात आले आहेत तेसुद्धा निसर्ग आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील मतदान केंद्र आणि सेल्फी पॉईंट्स तिथल्या आदिवासी संस्कृतीची झलक दाखवत आहेत. अनेक मतदान केंद्रांची रचना ही संपूर्णपणे बांबूवर आधारित आहे. आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्या संकल्पनेतून मतदान केंद्राची ही रचना करण्यात आली आहे.Sighting of forest, environment, tribal culture at polling booths……

ML/ML/PGB
19 Apr 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *