काळाराम मंदिरात रामनवमी साजरी

 काळाराम मंदिरात रामनवमी साजरी

नाशिक, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रामनवमी निमित्त नाशिक येथील जगप्रसिद्ध ऐतिहासिक काळाराम मंदिरात तसेच नाशिक शहरातील इतर मंदिरामध्ये रामनवमी उत्साहात संपन्न झाली. नाशिक येथील काळाराम मंदिरामध्ये दुपारी बारा वाजता राम जन्म उत्सव झाला , यावेळी विशेष महाआरती करण्यात आली.

नाशिक येथे राज्याचे मंत्री दीपक केसरकर भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांच्यासह काही मान्यवरांनी रामनवमीनिमित्त प्रभू काळाराम दर्शन घेऊन रामनवमी चे पर्व साधले. काळाराम मंदिरामध्ये पहाटेपासून एक लाखाहून अधिक भक्तांनी काळा रामाचे दर्शन घेतले. रामनवमी निमित्त विशेष पूजा आणि आरती करण्यात आली. काळाराम मंदिरामध्ये केवळ नाशिकच नव्हे तर देशातून आणि विदेशातूनही भाविकांनी गर्दी केली आहे .

नाशिक आणि पंचवटी परिसराला रामायणामध्ये विशेष महत्त्वाचे स्थान असून वनवासाच्या काळात या ठिकाणी प्रभू श्रीरामंनी वास्तव्य केल्याची मान्यता आहे. त्यामुळे पंचवटी परिसरात असलेल्या काळाराम मंदिराला महत्त्वाचे स्थान आहे, रामनवमीनिमित्त काळाराम मंदिरामध्ये दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी संस्थांच्या वतीने उन्हापासून संरक्षण आणि थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नाशिक येथील काळाराम मंदिरामध्ये आयुर्वेदिक पदार्थांपासून विशेषता सुंठ धने यापासून बनविलेली पंजिरी हा विशेष प्रसाद वाटपाची परंपरा आहे.

रामनवमी निमित्त काळाराम मंदिरामध्ये काही समाज उपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने रक्तदान शिबिर आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडवू नये म्हणून नाशिक पोलीस आणि दंगा नियंत्रण बॉम्ब शोधक पथक यांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे . काळाराम मंदिरातील प्रथा म्हणून वर्षातून एकदा रामनवमीच्या दिवशी 200 हून अधिक पदार्थांचा नैवेद्य म्हणजेच अन्नकोट करतात. विविध प्रकारचे मिठाई आणि पक्वान्न काळारामाला प्रसाद म्हणून अर्पण करतात. काळाराम मंदिरातील पुजारी घराण्यापैकी महिला विविध प्रकारची पक्वान्न तयार करून संध्याकाळी पारंपारिक वेशात पैठणी नऊवारी साडी नेसून हे पकवान काळारामला नैवेद्य म्हणून अर्पण करतात. त्यावेळेस विशेष आरती देखील करण्यात येते.

ML/ML/SL

17 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *