मुंबईतील या सहकारी बँकेवर RBIची कारवाई

 मुंबईतील या सहकारी बँकेवर RBIची कारवाई

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आर्थिक स्थिती ढासळल्याने RBIने मुंबई येथील सर्वोदय सहकारी बँकेवर अनेक निर्बंध लादले आहेत. सर्वोदय सहकारी बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या खात्यातून आता अवघे 15 हजार रुपये काढता येणार आहेत. तसेच पात्र ठेवीदारांना त्यांच्या ठेवींवर ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेव विमा दाव्याची रक्कम मिळण्याचा अधिकार असेल.

सर्वोदय सहकारी बँकेवरील बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 35A अंतर्गत निर्देशांच्या स्वरूपात असलेले निर्बंध सोमवार 15 एप्रिल 2024 पासून लागू झाले आहेत. आता बँक आरबीआयच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही कर्ज किंवा आगाऊ रक्कम देऊ शकणार नाही. तसेच त्यांचे नूतनीकरणही होणार नाही. तसेच बँक कोणतीही गुंतवणूक करू शकणार नाही, कोणतेही दायित्व घेऊ शकणार नाही किंवा कोणतेही पेमेंट करू शकणार नाही.

सर्व बचत बँक किंवा चालू खाती किंवा ठेवीदाराच्या इतर कोणत्याही खात्यातील एकूण शिल्लक रकमेपैकी 15 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्याची परवानगी नाही, असे आरबीआयने म्हटले आहे. बँकिंग परवाना रद्द केल्याने जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर कारवाई करू नये, असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात 8 एप्रिल रोजी आरबीआयने शिरपूर मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेवर कारवाई करत बँकेच्या पैसे काढण्याच्या सेवेवर बंदी घातली होती. बँकेची आर्थिक स्थिती पाहता पाऊल उचलले होते. आरबीआयच्या आदेशानंतर ग्राहकांना बँकेतील कोणत्याही चालू खाते किंवा बचत खात्यातून पैसे काढण्याची परवानगी नाही.

SL/ML/SL
16 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *