महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर यांनी दाखल केला अर्ज

 महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर यांनी दाखल केला अर्ज

धाराशिव, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘सत्तेत आल्यावर महागाई कमी करू, बेरोजगारी कमी करु पेट्रोलच्या किमती कमी करू म्हणत सत्तेवर आलेल्यानी जुमल्यावर जुमला खोटं बोलपण रेटून बोल अशा लोकांना तुम्ही मतदान करणार का,’ असा सवाल करत शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्र आणि महायुती सरकार जोरदार टीका केली ते आज उस्मानाबाद येथे प्रचार सभेत बोलत होते

आज महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला, तत्पुर्वी धाराशिव शहरातील अण्णाभाऊ साठे चौकातून शक्तिप्रदर्शन करत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.त्यानंतर नगरपरिषदेच्या समोरील मैदानात प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवसेनेचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे, माजी मंत्री अमित देशमुख, आमदार रोहित पवार, आमदार कैलास पाटील यांची उपस्थिती होती.

देशात बदलाचे वातावरण आहे आपल्या लोकशाहीला आणि संविधानाला धोका आहे भाजपाला हे संविधान बदलायचं आहे अशा भाजपाला तुम्ही निवडून देणार का असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांना केला या दहा वर्षात हुकूमशहाचे सरकार होते तुम्ही काय केलं ते सांगा असा सवाल केंद्र सरकारला केला यासरकारने महागाई बेरोजगारी कमी केली ? शेतकरी आत्महत्या कमी केल्या ? काहीच कमी केलं नाही मग यांना कशाला मतदान करायचं गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रात येणारा प्रत्येक उद्योग व्यवसाय हा गुजरातला नेला आहे तेंव्हा हे भाजपावाले मत मागायला आल्यावर त्यांना विचार एवढा महाराष्ट्र द्वेष का आहे.
तर रोहित पवार यांनी यांना चारशे पार संविधान बदलायला पाहिजे आहेत तेंव्हा आपली जबाबदारी वाढली आहे त्यामुळे भाजपाला हद्दपार करायचं असल्याचे सांगितले तसेच इथला उमेदवार चोरलेल्या चिन्हावर उभे आहेत त्यांचे बारा वाजवल्याशिवाय स्वस्थ बसू नका बहुमताने ओमराजे यांना निवडून द्या असे आवाहन केलं.तसेच अमित देशमुख यांनीही केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली.

ML/ML/SL

16 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *