सोलापूर आणि माढा मतदारसंघासाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल

सोलापूर, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी आज भाजपा कडून खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर माढा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार म्हणून आमदार राम सातपुते यांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना आणि भाजपाचे आजी माजी आमदार उपस्थित होते. निंबाळकर आणि सातपुते यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा सोलापुरात दाखल आहेत.
ML/ML/SL
16 April 2024