मुंबई, ठाण्यात Heat Wave Alert

 मुंबई, ठाण्यात Heat Wave Alert

मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विदर्भ, मराठवाडा उष्णतेच्या तडाख्याने होरपळत असताना आता कोकण विभागातही IMD उष्णतेच्या लाटेचा अलर्ट जारी केला आहे. मुंबई, रायगड आणि ठाण्यासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. आयएमडीकडून सोमवार (दि. १५) आणि मंगळवारी (दि. १६) उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सरासरी तापमानात 4.5 अंश सेल्सिअसहून अधिक भर पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर कमाल तापमान 37-39 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.

वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशाच्या हवामानात (Weather Update) मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे देशात कुठे अवकाळी पाऊस तर कुठे तीव्र उष्णतेची लाट दिसून येत आहे. महाराष्ट्रातही मराठवाडा, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, मुंबई, ठाणेसह किनारपट्टी भागात तापामानात वाढ होण्याचा अंदाज IMD ने वर्तवला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात तापमानात वाढ झाल्याचं दिसत आहे. IMDकडून आज आणि उद्यासाठी उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

वातावरणातील कोरडेपणा आणि वाढती उष्णता यामुळे हवामान विभागाने भरपूर पाणी पिण्याचं आवाहन जनतेला केलं आहे. याशिवाय सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेदरम्यान घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. बाहेर पडण्याची गरज भासल्यास योग्य ती काळजी घ्या. डोके झाकून घ्या, डोळ्यांच्या संरक्षणासाटी गॉगल वापरा, असं आरोग्यतज्ज्ञांनी सांगितलं आहे.

एप्रिल-जून महिन्यामध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दक्षिण द्वीपकल्प, मध्य भारत, पूर्व भारत आणि उत्तर भारताच्या बहुतेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेच्या शक्यता आहे. एप्रिल महिन्यामध्ये दक्षिण द्वीपकल्पातील अनेक भागात आणि उत्तर पश्चिम, मध्य भारत आणि पूर्व भारतातील काही भागांत तापमानात मोठी वाढ दिसून येईल.

SL/ML/SL

15 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *