पहिले भारतीय अंतराळ पर्यटक

 पहिले भारतीय अंतराळ पर्यटक

वॉशिंग्टन, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Amazon चे संस्थापक जेफ बेजोस यांच्या ‘ब्लू ओरिजिन’ या कंपनीतर्फे ‘एनएस-२५’ मोहमेवर पर्यटक म्हणून ते अंतराळाची सफर करणार आहेत. या मोहिमेसाठी एकूण सहा जणांची निवड करण्यात आली असून विशेष म्हणजे या मोहिमेत एका भारतीय व्यक्तीचाही समावेश आहे. गोपी थोटाकुरा हे भारतीय वंशाचे उद्याोजक आणि वैमानिक हे अंतराळ पर्यटन करणारे पहिले भारतीय ठरणार आहेत. ते विंग कमांडर राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात जाणारे ते दुसरे भारतीय असतील. शर्मा हे १९८४मध्ये अंतराळात गेले होते.

गोपी यांचा जन्म आंध्र प्रदेशात झाला असून त्यांनी ‘एम्ब्री-रीडर एअरोनॉटिकल युनिव्हर्सिटी’मध्ये पदवी प्राप्त केली आहे. गोपी थोटाकुरा हे व्यावसायिक उड्डाणाबरोबरच विविध प्रकारचे हौशी उड्डाणही करतात आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय वैद्याकीय वैमानिक म्हणूनही काम केले आहे. या उड्डाणादरम्यान, प्रत्येक अंतराळ पर्यटक ‘ब्लू ओरिजिन’च्या संस्थापकाच्या वतीने पोस्टकार्ड घेऊन जातील.

‘न्यू शेफर्ड’ हे ‘ब्लू ओरिजिन’द्वारे अंतराळ पर्यटनासाठी विकसित करण्यात आलेले, पूर्णत: पुन्हा वापरता येण्याजोगे उप-कक्षीय प्रक्षेपण वाहन आहे. या पर्यटन मोहिमेविषयी ‘ब्लू ओरिजिन’ने दिलेल्या माहितीनुसार, ‘‘गोपी हे एक वैमानिक आहेत आणि त्यांना वाहन चालवता येण्यापूर्वी विमान उडवता येऊ लागले होते’’. ते ‘प्रिझर्व्ह लाईफ कॉर्प’ या जागतिक केंद्राचे सहसंस्थापक आहेत.

SL/ML/SL
14 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *