गोडाचे थालीपीठ
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :एक थालीपीठ जरी खाल्ले तरी पोट भरते.. बाजारचे वेफ्रस, कुरकुरे या पेक्षा हे घरचे पौष्टीक थालीपीठ
केव्हाही चांगले…
लागणारे जिन्नस:
कणिक =१ वाटी
गुऴ = १/२ वाटी (किसलेला)
साजुक तुप = अंदाजे
वर दिल्याप्रमाणे एकवाटी कणिक त्यात १/२ वाटी किसलेला गुळ घालुन नेहमीच्या थालीपीठा सारखेच भिजवावे.(कीचीत सैलसर) आणि तव्यावर एक चमचा साजुक तुप घालुन थालीपीठ हातानेच थापावे. मध्य भागी
एक आणि आजुबाजुला ४ भोकं पा़डुन तुप सोडुन, झा़कण घालुन मंद आचेवर पाच मिनीटं होऊ द्यावे, नंतर सराट्याने उलथवुन असेच तुप सोडुन दुसर्या बाजुने पण खमंग करुन सर्व्ह करा.
Plate of sweets
ML/ML/PGB
12 Apr 2024