महायुती समर्थक आमदार लढविणार विरोधात लोकसभा

कोल्हापूर, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा इचलकरंजीचे महायुतीचे समर्थक अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी आज कोल्हापूरमधे पत्रकार परिषदेत केली. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी ही निवडणूक लढवत असल्याच आवाडे यांनी जाहीर केल. यामुळे या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पंचरंगी होणार आहे. आमदार आवाडे यांच्यासोबत जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे आणि शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे राहणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
ताराराणी पक्षाच्या वतीने खुद्द आमदार प्रकाश आवाडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने हातकणंगले लोकसभा मतदार संघात पंचरंगी निवडणूक होणार आहे. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आपली उमेदवारी असल्याचे यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितले असून निवडणुकीत उभारणार आणि जिंकणार देखील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
याआधी महायुतीकडून शिंदे सेनेचे खासदार धैर्यशील माने हे रिंगणात आहेत. तर त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी आव्हान दिले आहे. तीन दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची उमेदवारी शाहूवाडी पन्हाळ्याचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांना जाहीर केली आहे. तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बी. सी. पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही चौरंगी लढत लोकसभा मतदारसंघात चर्चेत असताना आज विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांच्या उमेदवारीची भर पडली आहे.Lok Sabha will fight pro-Maha Alliance MLAs
ML/ML/PGB
12 Apr 2024