अवकाळीने झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश

 अवकाळीने झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश

बीड, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्याच्या अनेक भागात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे विशेषकरून आंब्यासाह विविध फळपिकांचे नुकसान झाले असून, संबंधित जिल्हा प्रशासनास पंचनामे करण्याचे निर्देश मदत आणि पुनर्वसन विभागाने दिले आहेत. निर्धारित वेळेत पंचनामे पूर्ण करून मदतीसाठीचे अहवाल शासनाकडे सादर होतील. अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली आहे.

मदत आणि पुनवर्सन विभागास सध्या लोकसभा निवडणुकीच्या आचार संहितेमुळे मदत जाहीर करण्यास अडचणी तथा मर्यादा आहेत. मात्र तरीही प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांना योग्य ती मदत करण्याची कार्यवाही केली जाईल, असेही धनंजय मुंडे म्हणाले. Directs immediate panchnama of damage caused by bad weather

ML/ML/PGB
11 Apr 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *