पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या

 पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या

पुणे, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विद्येचे माहेरघर समजले जाणारे पुणे शहर काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करण्याचे राज्यातील प्रमुख ठिकाण म्हणून समोर आले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी- विद्यार्थिनी पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी वर्षानुवर्षे राहत असतात. परीक्षांचे बदललेले स्वरुप, आयोगाकडून परीक्षा रद्द होणे, पुढे ढकलणे, क्लासची अवाढव्य फी, अशा विविध प्रश्नांच्या गर्तेत अडकलेली ही तरुणाई आत्महत्येचे पाऊल उचलत असल्याच्या काही घटना गेल्या काही वर्षांपासून सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आज पुण्यात वसतीगृहात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी (competitive exam) करणाऱ्या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. वसतीगृहाच्या खोलीत गळफास घेऊन तिने आपले जीवन संपवले आहे. पुण्यातील गुरुवार पेठेत ही खळबळजनक घटना घडली.

अभिलाषा मित्तल (वय २७) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे आहे. अभिलाषा मूळची वाशिम जिल्ह्यातील रहिवाशी आहे. गेल्या महिन्यापासून ती पुण्यात राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती. या प्रकरणी पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मृत तरुणीच्या शरीरावर मारहाण झाल्याच्या खूना आढळल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. हत्या की आत्महत्या याचा पोलिसांकडून तपास केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अभिलाषा मित्तल ही तरूणी वाशिमची असून गेल्याच महिन्यात ती पुण्यात आली होती. पुण्यात राहून ती स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती. यासाठी तिने पुण्यातील गुरुवार पेठेतील एका मुलींच्या हॉस्टेलमध्ये खोली घेतली होती.

होस्टेलमध्ये राहणाऱ्या अभिलाषाच्या मैत्रिणीने सांगितले की, अभिलाषा होस्टेलच्या खोलीत एकटीच होती. तिच्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ झाला तरी ती बाहेर न आल्याने मैत्रिणीने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. खिडकीतून आत डोकाले असता अभिलाषा पंख्याला लटकलेली दिसली.

मैत्रिणीने याची सूचना तत्काळ पोलिसांनी दिली. पोलीस घटनास्थली दाखल झाले व त्यांनी तपास सुरू केला. प्राथमिक तपासानुसार अभिलाषाच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आढळल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी अभिलाषाचे नातेवाईक व मैत्रिणींची चौकशी करत आहेत.

SL/ML/SL

8 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *