भव्य रामकथेचे आयोजन सज्जनगडावरून येणार कथाकार
ठाणे, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आशीर्वाद फाऊंडेशन ह्या संस्थेतर्फे ठाण्यातील प्रशांतनगर मैदान, नौपाडा येथे ९ एप्रिल गुढीपाडवा ते १७ एप्रिल रामनवमी ह्या रामनवरात्र पर्वकाळामध्ये भव्य अश्या रामकथेचे आयोजन केले आहे.अयोध्येमध्ये रामल्ला प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर येणारा हा पहिलाच गुढीपाडवा आणि हि पहिलीच रामनवमी ह्या मणीकांचन योगाचे औचित्य साधून ह्या रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे.
रामकथा करण्यासाठी सज्जनगड येथून अजेय बुवा रामदासी येणार आहेत.
ठाणेकरांसाठी ही रामकथा म्हणजे मोठी पर्वणीच आहे. अवघे ठाणे राममय होऊन जाणार आहे. रोज सायंकाळी ५ ते ९ अशी हि रामकथा होणार आहे. रोज कथेच्या दिवसाचा शेवट प्रभू श्रीराम ह्यांच्या आरतीने होणार आहे.जास्तीत जास्त भाविकांनी आणि तरुणाईने ह्या रामकथेचे लाभ घ्यावा असे आवाहन आशीर्वाद फाऊंडेशन च्या संस्थपिका अश्विनी पटवर्धन ह्यांनी केले आहे.
आशीर्वाद फाऊंडेशन ह्या संस्थेने प्रस्तुत रामकथेतून सामाजिक समरसता घडवून आणण्यासाठी एक अभिनव असा उपक्रम योजला आहे. दर दिवशी श्रीराम ह्यांच्या आरतीसाठी समाजातील विविध सेवा देणारे, परंतु तसे दुर्लक्षित अश्या लोकांना बोलवण्यात येणार आहे. जसे की अग्निशामक दल, सफाई कामगार , स्मशानात काम करणारे लोक, पोलीस दल, शिक्षक असे समाजातील विविध क्षेत्रातील लोकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा संस्थेचा प्रयत्न आहे.
संपर्क
अश्विनी पटवर्धन ९८७०७७२०७७,
अलकनंदा जोशी ९२२३२३२८६४
ML/KA/PGB 8 APR 2024