वसईचे माजी आमदार डॉमनिक घोन्सालविस यांचे निधन

 वसईचे माजी आमदार डॉमनिक घोन्सालविस यांचे निधन

वसई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वसईचे माजी आमदार,विधान सभेचे प्रतोद आणि सहकार क्षेत्रातील अग्रगण्य डॉमनिक घोन्साल्विस यांचे काल सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले, ते ९३ वर्षाचे होते. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यांच्या मागे अॅलन , रोहन,युरी अशी तीन मुले,सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

बी.ए. पदवी घेतलेल्या डॉमनिक घोन्साल्विस यांनी काही काळ शासकीय मध्यवर्ती प्रेसमध्ये काम केले होते. समाजवादी विचारसणीमध्ये वाढलेल्या घोन्साल्विस यांनी जनता दलाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला होता. सुरुवातीच्या काळात त्यांनी पंचायत समिती सदस्य (१९७० ते १९७२) १३ वर्ष ठाणे जिल्हा परिषद सदस्य तर १९८५ ते १९९० या कालावधीत वसई मतदारसंघाचे आमदार म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटविला होता.

आमदारकीच्या काळात त्यांनी विधानसभेत पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून काम केले. १९९० च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा हितेंद्र ठाकूर यांच्याकडून पराभव झाला. सहकार क्षेत्रातही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उठविला होत. During his MLA tenure, he served as the chief representative of the party in the Legislative Assembly. He was defeated by Hitendra Thakur in the 1990 assembly elections. He also left his mark in the cooperative sector. बंगली सोसायटीचे संस्थापक संचालक, बँसीन कॅथॉलिक बँकेचे सचालक, खरेदी-विक्री संघाचे संस्थापक अध्यक्ष, पान मार्केटिंग सोसायटीचे चेअरमन (१९६७ ते २००६) ,कार्डिनल ग्रेशस हॉस्पिटलचे विश्वस्त, वसई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष, पिगरी सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष, साधना भांडारचे संस्थापक, साधना सहकारी पतपेढीचे संस्थापक, म. बि. कुलकर्णी ट्रस्टचे अध्यक्ष, पान मार्केटिंग चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ,लोकसेवा मंडळाचे सचिव अशी विविध पदे त्यांनी भूषविली होती. घोन्साल्विस यांच्यावर आज सकाळी सांडोर येथील सेंट थॉमस चर्च येथे अंत्यविधी करण्यात आले.

Former Vasai MLA Domnik Ghonsalvis passed away

ML/ML/SL

8 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *