शेफ विष्णू मनोहर यांनी केला 15×5 फूट आकाराचा ‘महा केक’
नागपूर, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीचे सध्या धुमशान सुरू असून प्रत्येक नागरिकाला आपला मतदानाचा हक्क बजावण्याची उत्तम संधी आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण केलेले हजारो युवक-युवती पहिल्यांदाच या मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. नवमतदारांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशानेप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी पहिल्यांदा मतदान करणाऱ्या युवा वर्गासाठी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीयर्स धरमपेठ नागपूर येथे 15 बाय 5 फूट आकाराचा केक तयार करून केक पार्टीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
नव मतदारांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी आणि नागपूर जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून शेफ विष्णू मनोहर यांची ‘एसव्हीप आयकॉन (SVEEP ICON)’ म्हणून नामनिर्देशित करण्यात आले आहे. त्याअंतर्गत ‘मेरा वोट, देश के लिए’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित ही ‘केक पार्टी’ आयोजित करण्यात आले आहे.
देशाला अत्यंत कठीण परिस्थितीत स्वातंत्र्य मिळाले आहे. ही लोकशाही टिकवून ठेवायची असेल तर प्रत्येकाने देशासाठी मतदान केले पाहिजे, असे मत पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल यांनी व्यक्त केले. नवमतदारांनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीयर्समध्ये ‘माझे पहिले मत देशासाठी’ असा नारा देत ‘केक’ कापून लोकशाहीचा जागर केला. तयार करण्यात आलेला हा केक नवमतदारांना वितरित करण्यात येत आहे.
ML/ML/SL
7 April 2024