पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी उभी राहणार कल्याणची गुढी!
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कल्याण येथील एका महिलेने एक पर्यावरणपूरक गुढी तयार केली असून ही गुढी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्लीतिल घरी पाडव्याच्या दिवशी उभारली जाणार आहे. ही गुडी पर्यावरणपूरक पद्धतीने तयार करण्यात आली असून पर्यावरण रक्षणाचा संदेश ही गुढी देणार आहे. देशात राम मंदिराची उभारणी केल्याबद्दल आणि देशाच्या संस्कृतीचे संवर्धन केल्याबद्दल आदरभाव व्यक्त करण्यासाठी ही गुढी टपालाने पाठववण्यात आल्याची माहिती, गुढी व्यवसायाच्या मुख्य प्रवर्तक मेधा मोहन आघारकर यांनी दिली.
मेधा आघारकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील ही गुढी टपालाने पाठवली आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात तसेच अनेक जण कामाच्या व्यापात असल्याने त्यांना त्यांच्या घरी गुढी उभारणे शक्य होत नाही. तसेच या सणाची माहिती देखील अनेकांना माहिती नसते. यामुळे या सणाचे महत्व टिकून राहावे आणि याची माहिती सर्वांना मिळावी व त्या माध्यमातून संस्कृती रक्षण व्हावे या हेतूने मेधा आघरकर या गेल्या १५ वर्षापासून त्यांच्या घरी कागद, कपड्याच्या पर्यावरणपूरक गुढ्या तयार करत आहेत. या व्यवसायाची सुरुवात त्यांनी दोन ते तीन महिलांच्या साह्याने सुरूवात केली होती. आज त्यांच्या कडे १५ महिला ही पर्यावरण पूरक गुढी तयार करण्याचे काम करतात. त्यांनी या माध्यमातून रोजगाराचे साधन तयार केले आहे. यातून त्या राज्याची संस्कृती देखील पुढे घेऊन जात आहे.
PGB/ML/PGB
6 Apr 2024