अपहार प्रकरणी महिला अधिकाऱ्यास तब्बल २४ वर्षांनी सक्तमजुरी

 अपहार प्रकरणी महिला अधिकाऱ्यास तब्बल २४ वर्षांनी सक्तमजुरी

बीड, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात शासकीय तिजोरीतील ५ लाख ३१ हजार रुपयांचा अपहार करून नंतर रोखपाल विरोधात अपहाराची तक्रार देणाऱ्या महिला प्रशासकीय अधिकाऱ्यास अंबाजोगाई येथील अतिरिक्त मुख्य न्या. एम.वाय. वाघ यांनी दोषी ठरवून चार वर्षांचा सश्रम कारावास आणि सहा लक्ष रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

सदरील प्रकरण २००० साली घडले होते. विजया रोहीदास मस्के असे त्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. स्वाराती रुग्णालय येथे प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या विजया मस्के हिने रोखपाल किशोर हेमराज पालीवाल याने शासकीय तिजोरीत असलेल्या पाच लाख एकतीस हजार पाचशे चौतीस रुपयांचा अपहार केल्याची तक्रार ३१ मार्च २००० रोजी अंबाजोगाई शहर ठाण्यात दिली होती. या तक्रारीवरून किशोर पालीवाल याच्यावर कलम ४०९, ४७७ अन्वये गुन्हा नोंद झाला. मात्र पोलीस उपनिरिक्षक पाटील यांनी केलेल्या तपासात फिर्यादी विजया मस्के आणि किशोर पालीवाल रोखपाल या दोघांकडेही शासकीय तिजोरीच्या चाव्या असल्यामुळे त्यांनी तिजोरीतील रक्कम संगनमताने स्वतः घेवून अफरातफर केल्याचे निष्पन्न झाल्याने विजया मस्के हिला देखील आरोपी करण्यात आले.

या गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर अंबाजोगाई येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायलयात सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण अकरा साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या जबाबावरून मुंबई येथून आलेल्या दक्षता पथकाचे प्रमुख परब साहेल आणि तत्कालीन अधीष्ठाता कवठेकर लेखा परिक्षण करण्यासाठी तिजोरी उघडली असता तिजोरीतून अपहाराची रक्कम गायब झाल्याचे आणि केवळ २ हजार १९६ रुपये तिजोरीत शिल्लक असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तिजोरी सील करण्यात आली.

त्यानंतर सर्व सरकार पक्षाचे साक्षीदार यांचे जबाब तसेच रोकडवही, हजेरीपट यांचे अवलोकन केल्यानंतर आरोपी विजया मस्के हिनेच अपहार केल्याचे निष्पन्न झाल्याने न्यायालयाने तिला चार वर्षे सक्तमजुरी आणि सहा लक्ष रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर, किशोर पालीवाल यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. दंडाची रक्कम वसूल झाल्यास स्वाराती रुग्णालयाच्या नर्सिंग विभागास त्या रक्कमेतून पाच लाख पन्नास हजार रुपये देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता एन.बी. केंद्रे यांनी काम पाहिले तर त्यांना कामकाजात अ‍ॅड. डी.बी. फड यांनी सहकार्य केले. Forced labor for woman officer after 24 years in embezzlement case

ML/ML/PGB
6 Apr 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *