पक्ष्यांसाठी ठेवले ज्वारीचे एक एकर क्षेत्र
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निसर्ग व सामाजिक, पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष यांनी पक्ष्यांसाठी ज्वारीचे एक एकर क्षेत्र राखीव ठेवले असल्याची माहिती प्रमोददादा मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
ही संस्था दरवर्षी उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी, मुठभर अन्न, घोटभर पाणी, योजना राबवत आहे. यासाठी मातीची भांडी (परळ) वाटप करतच असते. विविध उपक्रम राबवत असते. याचाच एक भाग म्हणून मोरे यांनी पक्ष्यांसाठी अन्न पाणी सोय म्हणून आपल्या शेतातील एक एकर ज्वारी पिकाची काढणी न करण्याचा उचित निर्णय घेतला.
पिक पक्ष्यांना अन्न म्हणून शेतातच उभे ठेवले आहे. जसे आपण वाचतो, बघतो, चिमण्यांची शेती हा उपक्रम तसे. पक्ष्यांसाठी मुठभर अन्न व घोटभर पाणी, या आपल्या मंडळाच्या उपक्रमाची सुरुवात स्वतःपासून केली आहे.
आधी केले मग सांगितले. ही म्हण येथे तंतोतंत लागू पडते. त्यांचे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्याचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, विविध पशुपक्षी संस्था राज्यभरातील नागरिक यांच्याकडुन कौतुक होत आहे. पक्ष्यांसाठी ठेवले ज्वारीचे एक एकर क्षेत्र
ML/ML/PGB
5 Apr 2024