भाजपाच्या नवनीत राणांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

 भाजपाच्या नवनीत राणांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

नवी दिल्ली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विविध कारणांमुळे विदर्भातील भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या लोकसभा उमेदवारीत मोठा अडथळा ठरू शकणारा प्रश्न आज सर्वोच्च न्यायालयाच निकाली निघाला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार असलेल्या नवनीन राणा यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणात आज सुनावणी पार पडली. या सुनावणीत त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्या. जे. के महेश्वरी आणि संजय करोल यांच्या खंडपीठाने या प्रकरणी निर्णय दिला आहे. नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणी हा निर्णय आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय दिला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय रद्द केला आणि नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र वैध असल्याचं म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला. मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र २०२१ मध्ये अवैध ठरवले होते. त्यानंतर नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली होती. तसेच, बनावट जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणाचा दोनही गटाचा युक्तीवाद २८ फेब्रुवारीला पूर्ण झाला.

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता.मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय दिला होता. याविरोधात नवनीत राणा या सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या. नवनीत राणा यांच्या वडिलांनी दबाव टाकून शाळा सोडल्याचा बोगस दाखला जात प्रमाणपत्रासाठी दिल्याचे सिद्ध झाले होते. तसेच, उच्च न्यायालयातील अनेक तारखांना नवनीत राणा आणि त्यांचे वडील गैरहजर राहिले होते. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. लाईव्ह लॉ ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आनंदाची गोष्ट आहे. जे लोक नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्रावर बोट उचलत होते आणि राजकारण करत होते, त्यांना सर्वोच्च न्यायालयाने उत्तर दिलं आहे. नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवलं आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो.”

SL/ML/SL

4 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *