पालघरच्या जांभळांना मिळाले भौगोलिक मानांकन

 पालघरच्या जांभळांना मिळाले भौगोलिक मानांकन

पालघर, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकण विभागात येणारा बहुतांश आदिवासींची वस्ती असलेला पालघर जिल्हा हा वैशिष्ट्यपूर्ण फळपिकांसाठी ओळखला जातो. उन्हाळ्याची रणरण सुरु झाली की, मुंबई आणि आसपासच्या परिसरात टप्पोरी जांभळे दिसू लागतात. यामध्ये पालघर जिल्ह्यातील आता बहाडोली जांभळांना विशेष मागणी असते. या प्रसिद्ध जांभळांना आता भौगोलिक मानांकन (Geographical Indication) मिळाले असून बहाडोली आणि परिसरातील गावांमध्ये स्थानिक शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. भौगोलिक मानांकन बहाडोली जांभूळ उत्पादक शेतकरी गट या नावाने मिळाले आहे. याबाबत कृषी विभाग आणि ‘आत्मा’ अंतर्गत २०१९ पासून जांभूळ उत्पादकांना मार्गदर्शन केले जात होते. ३० मार्चला याबाबत प्रमाणपत्र मिळाले असून याचा थेट १५० शेतकऱ्यांना होणार आहे.

गटात सहभागी असणाऱ्या १५० शेतकऱ्यांना या हंगामापासूनच जांभळाच्या व्यापारासाठी आकर्षित पॅकेजिंग आणि बोधचिन्हाचा वापर करता येणार आहे. तर यामुळे शेतकऱ्यांच्या व्यापारात वाढ होऊन आर्थिक विकास होण्यास मदत मिळणार आहे. बहाडोली जांभूळ उत्पादक शेतकरी गट नावाने भौगोलिक मानांकन प्राप्त झाल्याने बहाडोली आणि परिसरातील गावांमध्ये सध्या आंदोत्सव केला जात असून शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. या भागात असणाऱ्या जांभळाच्या बागांमध्ये वेगवेळे व्यवसाय केले जात आहेत. येथे औषधी गुणांनीयुक्त जांभळाच्या बियांपासून पावडर, तर जांभळाची वाईन निर्मिती करण्यात येत आहे.

पालघर जिल्हा फळबागायत दारांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असून येथील चिकू प्रसिद्ध आहेत. तर चिकू या फळाला २०१६ साली डहाणू, घोलवड या नावाने भौगोलिक मानांकन मिळाले आहे.

ML/SL/ML/

4 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *