प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

 प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

नांदेड, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार भाजापचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण , खासदार डॉ अजित गोपछडे यांच्या सह प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. तत्पूर्वी शहरातून भव्य मिरवनूक काढण्यात आली होती.

अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत बोलताना उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ही निवडणूक देशाची आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वाखाली देशाने मागील दहा वर्षात जो विकास केला आहे त्या विकासाची गती वाढण्यासाठी आणि महाराष्ट्रासह मराठवाडा तसेच विदर्भाच्या विकासाचे स्वप्न पूर्ण नांदेड लोकसभा मतदारसंघातून चिखलीकर यांना प्रचंड मताने निवडून द्या.

मराठवाड्यात अशोक चव्हाण यांचे वर्चस्व आहे. विरोधी पक्ष्यात असताना सुद्धा विकासाच्या मुद्यावर बाबत त्यांचे कधी मतभेद झाले नाही, ते भाजप मध्ये यावेत यासाठी आम्ही अनेक दिवसापासून प्रयत्न करत होतो, आज ते कुठलीही अट न ठेवता फक्त मराठवाड्याचा विकास व्हावा या अटीवर भाजप मध्ये आले, महाविकास आघाडी मध्ये राहून देखिल अशोक चव्हाणांनी विकासाच्या मुद्द्यावर सहकार्य केल. आम्ही विदर्भ आणि मराठवाड्याच विकास करू, रेल्वे, रस्ते वेगवेगळे प्रश्न आम्ही सोडवले. आता अशोक चव्हाण यांचा सारखा नेता आमच्या सोबत आहे. त्यामुळे ही जागा निर्विवाद पणे मोठ्या फरकाने विजयी असे ते म्हणाले. मोदीजींनी विकसीत भारताची गॅरेटी दिली आहे, मोदीजीमुळे भारताची अर्थ व्यवस्था मजबूत झाली आहे. भारत कोवीड नंतर देखील सावरला हे केवळ मोदीजीमुळे झाले. त्यांच्या कुशल आणि विकासाभिमुख नेतृत्वामुळे भाजप 400
पार जाईल पण काॅग्रेस 40 पार जाईल की नाही ते सांगता येणार नाही.

तर यावेळी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की देश दुस-याच्या हाती देऊन आता आम्हाला प्रयोग करायचा नाही. बसवराज पाटील, संजय निरूपम का जात आहेत त्याचा नाना पटोलींनी विचार केला पाहिजे. माझ्या वर टीका करण्यापेक्षा आपण काय केलं हे ही पाहवं असा उपरोधिक टोला ही त्यानी पाटोले याना लगावला. विकसित मराठवाडा, विकसित विदर्भ ये शक्य होतय ते केवळ देवेंद्र फडणवीसांमुळे. त्यामुळे देशाचा, महाराष्ट्राचा , मराठवाडा , विदर्भ आणि आपल्या भागाचा विकास करण्यासाठी 4 जुनला प्रचंड मतांनी महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष नागेलीकर आणि सुरेश अंबुलगेकर या जिल्ह्यातील प्रभाव असलेल्या नेत्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला.

ML/ML/SL

4 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *