महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी

 महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी

यवतमाळ, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रातील तसेच राज्यातील महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीही केलं नाही ,अजून पर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही अशी टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज यवतमाळ येथे केला .महाविकास आघाडीचे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय देशमुख यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले असता जाहीर सभेत ते बोलत होते .

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ताबडतोब पैसे जमा झाले असे सांगून महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे यावेळी ते म्हणाले. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळविले जात असून येथील भारतीय जनता पार्टीचा किंवा शिंदे गटाचा एकही आमदार काही बोलत नसल्याचे पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले. याच वेळी आमदार रोहित पवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अबकी बार 400 पार असं म्हणत आहेत मात्र अनेक ठिकाणी त्यांना अजून पर्यंत उमेदवार सापडला नसल्याची टीका केली. यावेळी, संजय देशमुख , माणिकराव ठाकरे, वसंतराव पुरके आदी नेत्यांचीही भाषणे झाली.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *