गोव्याच्या ‘जायफळ टॅफी’मिळाले पेटंट

 गोव्याच्या ‘जायफळ टॅफी’मिळाले पेटंट

पणजी, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या विविध भागातील वैशिष्ट्यपूर्ण मसाला पिकांना विदेशांतून मोठ्या प्रमाणात मागणी असते. जायफळ दक्षिण भारतात होणारे महत्त्वाचे मसाला पिक आहे. विविध पदार्थ्यांची चव वाढवण्याबरोबरच औषध उत्पादनासाठीही याचा उपयोग केला जातो. गोव्यात होणाऱ्या ‘जायफळ टॅफी’या उत्पादनाला पेटंट मिळाले आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक झाडामागे ५,६०० रुपये अतिरिक्त वार्षिक उत्पन्न मिळणार आहे. जायफळ हे भारतातील एक महत्त्वपूर्ण मसाला पीक असून त्याची प्रामुख्याने जायफळ बी आणि गर यासाठी लागवड केली जाते.

गोव्यातील भारतीय कृषी संशोधन परिषद – केंद्रीय तटीय कृषी संशोधन केंद्रातील डॉ.ए.आर.देसाई आणि त्यांच्या नेतृत्वाखालील चमूच्या “जायफळ टॅफी” तयार करण्याची प्रक्रिया आणि त्यापासून बनवलेले उत्पादन-नामाच्या शोधाला पेटंट मिळाले आहे. यासाठी क्रमांक ५२८११९ (अर्ज क्रमांक २०१६२१०१२४१४, ८ एप्रिल २०१६) प्रदान करण्यात आला आहे.

कापणीनंतर बहुतेक वेळा जायफळाचे बीज कोष शिल्लक राहतात. या शिल्लक उप-उत्पादनाची दखल घेत गोव्यातील आयसीएआर – सीसीएआरआ ने जायफळ बीज कोषांचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या उद्देशाने एक उपाय विकसित केला आहे. जायफळ बीज कोष टॅफी या नाविन्यपूर्ण उत्पादनामध्ये मोठे पौष्टिक मूल्य असून ते ताज्या फळाच्या ८० ते ८५ टक्के इतके असते. कृत्रिम संरक्षकांशिवाय सामान्य तापमानात १२ महिन्यांपर्यंत सोयीस्करपणे साठवले जाऊ शकते.

SL/ML/SL

1 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *