गडचिरोली-छत्तीसगड सीमेवर नक्षली कॅम्प उद्ध्वस्त…
गडचिरोली, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विध्वंसक कारवाया करण्यासाठी कसनसूर, चातगाव नक्षल दलम गडचिरोली – छतीसगड राज्यातील मानपूर जिल्ह्यातील चुटीनटोला गावाजवळ (एसपीएस पेंढरीपासून 12 किमी पूर्वेला) सीमेवर एकत्र येत नक्षल कॅडर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
गडचिरोली पोलिसांना माहिती होताच त्यांनी हा नक्षल कॅम्प ल उद्ध्वस्त केला.
गडचिरोली सी 60 पोलिस अतिशय कठीण अशा पहाडी भागात असलेल्या ठिकाणी सर्च ऑपरेशन करीत असताना या कँपवरील नक्षल जंगलाचा फायदा घेत पसार झाले. या सर्च ऑपरेशन दरम्यान महत्त्वाचे नक्षली साहित्य जप्त करण्यात आले आहे. यात कॉर्डेक्स वायर, डिटोनेटर, जिलेटिन स्टिक्स, बॅटरी, वॉकी टॉकी चार्जर, बॅकपॅक इत्यादींचा समावेश .
C 60 पोलीस दल आज सुखरूपपणे गडचिरोलीला पोहोचले असून छत्तीसगड सीमेवर नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात त्यांना यश आले आहे. एकाच महिन्यात चार नक्षलचा खात्मा त्यानंतर रात्रीच्या दरम्यान झालेली चकमक आणि आता नक्षल कॅम्प उध्वस्त केल्याने नक्षली बॅक फुटवर गेल्याचे मानले जाते. गडचिरोली पोलिसांनी नक्षल्यांना सळो की पळो करून सोडल्याने जिल्ह्यात सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. Naxalite camp destroyed on Gadchiroli-Chhattisgarh border…
ML/ML/PGB
31 March 2024