दही बटाटे भाजी

 दही बटाटे भाजी

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी द्रव गोष्टींचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत, जर आपल्याला नेहमीच्या भाज्यांच्या चवीने कंटाळा आला असेल तर आपण घरात बटाटा वापरुन विविध भाज्या बनवू शकतो. उन्हाळ्यात दही खाणे चांगले असते. त्यामुळे आपण दही बटाटा ही भाजी बनवू शकतो.

लागणारे जिन्नस: 

दही – 350 ग्रॅम
बटाटे – 4-5
देसी तूप – 2 टी स्पून
काजू पावडर – 2 चमचे
जिरे – 1/2 टी स्पून
लाल मिरची पावडर (तिखट) – 1/2 टी स्पून
अदरक/आले बारीक चिरलेले – 1 टी स्पून
टोमॅटो चिरलेला – 1 (पर्यायी)
हिरव्या मिरच्या कापलेल्या – 2
हिरवी कोथिंबीर चिरलेली – 1 टी स्पून
सेंधव मीठ – चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

1. बटाटे कुकरमध्ये उकडा.
2. उकडलेल्या बटाट्याच्या साली काढून त्यांचे छोटे तुकडे करा.
3. मग एका भांड्यात दही घेऊन चांगले फेटा.
4. त्या दहयामध्ये लाल मिरची पावडर (तिखट), सेंधव मीठ, काजू पावडर टाकून चमच्याने ते चांगले मिसळा. हे मिश्रण बाजूला ठेवा.
5. आता एका कढई (पॅन) मध्ये तूप टाकून मंद आचेवर ठेवा. तूप वितळल्यावर जिऱ्याची फोडणी द्या. जिरे तडकायला लागल्यावर त्यात अद्रक (आले) चे तुकडे टाका आणि एक दोन मिनिटे शिजू द्या. यानंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि टोमॅटो टाका आणि जवळजवळ दोन मिनिटे शिजवावे.
6. मग तुकडे केलेले शिजलेले बटाटे या मिश्रणात टाका आणि एका मोठ्या लाकडी चमच्याने चांगले मिसळा. आता ही भाजी काही वेळ शिजू द्या.
7. जेव्हा बटाटे थोडेसे लाल होतील, तेव्हा ते गॅस वरुन उतरवा आणि त्यात दह्याचे मिश्रण टाका.
8. आता पुन्हा एकदा गॅसवर ती कढई (पॅन) मंद आचेवर ठेवा आणि दोन मिनिटे शिजू द्या. भाजी जास्त पातळ हवी असल्यास आणखी पाणी टाकू शकता.
9. आपली स्वादिष्ट दही बटाटा भाजी आता सर्व्ह करण्यास तयार आहे.

curd potatoes vegetables

PGB/ML/PGB
30 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *