विदर्भात महायुतीत दरार, प्रहार ने उतरवला वेगळा उमेदवार

विदर्भात महायुतीत दरार, प्रहार ने उतरवला वेगळा उमेदवार
अमरावती, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीत दरार पडली असून भाजपाच्या नवनीत राणा यांच्या उमेदवारीला सुरुवातीपासून विरोध करणाऱ्या आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ति पक्षा तर्फे दिनेश बूब यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात महायुती सरकारमधे घटक असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू हे आहेत. या पक्षाचे विधानसभेत दोन आमदार आहेत.अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जाती साठी राखीव आहे.या मतदारसंघात विद्यमान खासदार नवनीत राणा ह्या भाजपाच्या उमेदवार आहेत. नवनीत राणा यांना भाजपा तर्फे उमेदवारी दिल्यामुळे आमदार बच्चू कडू नाराज असल्याने त्यांनी त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने दिनेश बुब यांना उमेदवारी दिली असल्याचे बोलल्या जात आहे. आज पत्रकार परिषदेत प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार राजकुमार पटेल यांनी दिनेश बूब यांच्या नावाची घोषणा केली. Daraar, Prahar fielded a different candidate in the Vidarbha Grand Alliance
PGB/ML/PGB
29 March 2024