उमेदवार ठरविण्याच्या बैठकीतच मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांत हाणामारी

छ संभाजीनगर, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती संभाजीनगर मध्ये आज मराठा समाजाचा लोकसभेचा उमेदवार ठरवण्यासाठी बैठकीचा आयोजन करण्यात आलं होतं मात्र या बैठकीत सुरुवात होतात चांगलाच गोंधळ झाला. उमेदवारांकडून विशेषतः शिवसेना उद्धव ठाकरे गट उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्याकडून पैसे घेऊन काही लोक इथं आल्याचा आरोप काही मराठा कार्यकर्त्यांनी केला त्यातून शाब्दिक वादावादी सुरू झाली आणि त्याचा पर्यावसन प्रचंड हाणामारीत झालं.
तब्बल १५ ते २० मिनिटं या बैठकीत हा वाद आणि हाणामारी सुरु होती. सुरुवातीला पुरुष कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली नंतर महिला कार्यकर्त्यासुद्धा भिडल्या. काही वेळानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि वाद थांबवला. जाणीवपूर्वक काही लोक मराठा समाजाचं आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप उपस्थित आंदोलकांनी केला.
In the meeting to decide the candidate, why the Maratha community
ML/ML/PGB
29 March 2024