काँग्रेसला मोठा धक्का, उमेदवाराचे जात प्रमाणपत्र रद्द

 काँग्रेसला मोठा धक्का, उमेदवाराचे जात प्रमाणपत्र रद्द

नागपूर दि २८– रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले असून हा काँग्रेस ला मोठा धक्का बसला आहे.

रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज रामटेक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल करणाऱ्या रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र राज्य सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या जात पडताळणी समितीकडून अवैध ठरविण्यात आले आहे. त्यामुळे आज रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचा जात प्रमाणपत्रावर भाजप नेत्यांनी आक्षेप घेतला होता. त्यानतंर हे प्रकरण जिल्हाधिकारी यांचा मार्फत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या जात पडताळणी समितीकडे पाठविण्यात आले होते. असे असतांनाही काल अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांनी पक्षाची ताकद दाखवीत, शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र आज त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले आहे. हा काँग्रेस करीता मोठा धक्का मानला जात आहे..

ML/KA/PGB 28 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *