LIC ला 178 कोटी रुपयांची GST डिमांड नोटीस

 LIC ला 178 कोटी रुपयांची GST डिमांड नोटीस

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ला झारखंड राज्यातून जीएसटी डिमांड नोटीस प्राप्त झाली आहे. एलआयसीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले की, दोन आर्थिक वर्षांसाठी जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) कमी भरल्याबद्दल त्यांना कर अधिकाऱ्यांकडून सुमारे 178 कोटी रुपयांची नोटीस मिळाली आहे. कंपनीला अतिरिक्त आयुक्त, सेंट्रल जीएसटी आणि सेंट्रल एक्साइज, जमशेदपूर यांच्याकडून व्याज आणि दंडाची मागणी आदेश प्राप्त झाला आहे.

नोटीसमध्ये 161 कोटी 62 लाख 33,898 रुपयांचा जीएसटी, त्यावरील व्याज आणि 16 कोटी 16 लाख 23,390 रुपये दंडाची मागणी करण्यात आली आहे. ही नोटीस 2018-19 आणि 2019-20 या आर्थिक वर्षांसाठी आहे.

LIC ने एका वेगळ्या संप्रेषणात म्हटले की, गुजरात राज्यातून जारी करण्यात आलेल्या जीएसटी नोटिशीच्या विरोधात त्यांनी 26 मार्च 2024 रोजी आयुक्त (अपील), अहमदाबाद यांच्याकडे अपील दाखल केले आहे. नोटीसमध्ये कर अधिकाऱ्यांनी कंपनीला 2017-18 या आर्थिक वर्षासाठी सुमारे 39.39 लाख रुपयांचा GST कमी भरल्याबद्दल नोटीस बजावली होती. 2017-18 या आर्थिक वर्षासाठी 19,74,584 रुपयांच्या जीएसटीसह 19,64,584 रुपयांचा दंड आणि त्यावर लागू व्याजाची मागणी करण्यात आली होती. अतिरिक्त आयुक्त, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर, गांधीनगर यांनी जानेवारी 2024 मध्ये ही नोटीस जारी केली होती.

SL/ML/SL

27 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *