सदानंद दाते यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या महासंचालक पदी नियुक्ती

 सदानंद दाते यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या महासंचालक पदी नियुक्ती

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 1990 च्या तुकडीत आयपीएस अधिकारी व महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख सदानंद दाते यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सदानंद दाते यांनी महाराष्ट्र पोलीस दलात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. मुंबई पोलीस दलात त्यांनी कायदा व सुव्यवस्था सहपोलीस आयुक्तपद भूषवले होते. याशिवाय मिरा-भाईंदर पोलीस दलाच्या आयुक्तपदाची धुराही दाते यांनी सांभाळली होती. केंद्रातही सीआरपीएफमध्ये प्रतिनियुक्तीवर त्यांनी काम केले होते. २६-११ ला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही त्यांनी शौर्य दाखवून दहशतवाद्यांना तोंड दिले. जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद, खलिस्तानी कारवाया आणि अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि जगाच्या इतर भागांतील दहशतवाद्यांचा तपास करण्याबरोबरच, एनआयएकडे पीएफआय संबंधीत तपास सुरू आहेत. त्यांच्याकाळात एटीएसने पाकिस्तानी हनीट्रॅप, बांगलादेशी नागरिकांविरोधील कारवाई, पीएफआयप्रकरणात छापेमारी अशा विविध कारवाया केल्या होत्या. Sadanand Date appointed as Director General of National Investigation Agency

ML/ML/PGB
27 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *