महानगरी मुंबईत राहतात आशियातील सर्वांधिक अब्जाधीश

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताची आर्थिक राजधानी मुंबई आशियातील अब्जाधीशांची राजधानी बनली आहे. चीनची राजधानी बीजिंगला मागे टाकत मुंबईने प्रथमच हे स्थान मिळवले आहे. येथे 603 चौरस किलोमीटर परिसरात 92 अब्जाधीश राहतात, तर बीजिंगच्या 16,000 चौरस किलोमीटर परिसरात 91 अब्जाधीश आहेत. ‘हुरुन रिसर्चच्या 2024 ग्लोबल रिच लिस्ट’नुसार, गेल्या एका वर्षात 26 नवीन लोक अब्जाधीश झाले आहेत. तर बीजिंगमध्ये या कालावधीत 18 लोकांना या यादीतून वगळण्यात आले आहे. चीनमध्ये 814 अब्जाधीश आहेत, तर भारतात 271 अब्जाधीश आहेत.
जागतिक स्तरावर या यादीत मुंबई आता तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. न्यूयॉर्क पहिल्या स्थानावर आहे, येथे 119 अब्जाधीश राहतात, तर लंडन दुसऱ्या स्थानावर आहे, जिथे 97 लोक अब्जाधीश आहेत. अब्जाधीश म्हणजे ते लोक ज्यांची संपत्ती 8,333 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.अहवालानुसार, मुंबईतील एकूण ९२ लोकांची संपत्ती एका वर्षात ४७ टक्क्यांनी वाढून ४४५ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. त्याच वेळी, चीनच्या राजधानीतील अब्जाधीशांची संपत्ती 28% कमी होऊन $265 अब्ज झाली आहे.
ML/SL/SL
26 March 2024